ओबामांच्या हत्येची इसिसकडून धमकी

0
79

इस्लामिक स्टेट इन इराक अँड सिरिया (आयएसआयएस) तथा इसिस या दहशतवादी संघटनेने फ्रान्स, बेल्जियम या देशांसह अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची व्हाईट हाऊसमध्ये शिरून हत्या करण्याची धमकी दिली आहे. तसेच अमेरिकेला मुस्लिम राष्ट्र बनविण्याचीही एका व्हिडिओच्या माध्यमातून धमकी दिली आहे.या व्हिडिओत एका कुर्दिश जवानाला गळा चिरून ठार केल्याचेही दिसत आहे. जगातील एक क्रूर दहशतवादी संघटना असलेल्या इसिसने अलीकडेच फ्रान्समध्ये पत्रकारांची हत्या केली होती. या संघटनेला संपविण्याचा ओबामा यांनी निर्धार व्यक्त केला होता.
ओबामा यांच्याबरोबरच फ्रान्स व बेल्जियम या देशांना इंगा दाखवण्याचे या संघटनेने स्पष्ट केले आहे. कार बॉम्ब घेऊन येऊन तेथे विध्वंस घडवून आणण्याचे या धमकीत म्हटले आहे. जेवढ्या वेळा कुर्दिश लष्कर आपल्या लोकांवर क्षेपणास्त्र हल्ला करतील त्याहून मोठ्या संख्येने जवानांचा शिरच्छेद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.