भारताला ऑस्करचा पहिला सन्मान मिळवून देणार्या प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर भानू अथैया (९१) यांचे काल निधन झाले. त्यांची कन्या राधिका यांनी भानू यांच्या निधनाचे वृत्त दिले. भानू अथैया यांनी मिळवून दिला.
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर मिळाला होता. या कामगिरीसाठी त्यांना १९८३ साली ऑस्कर पुरस्काराने सन्मानीत केले गेले. त्यानंतर २००१ साली आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटासाठी त्यांना पुन्हा एकदा ऑस्करचे नामांकन मिळाले होते. मात्र थोडक्यात त्यांचा हा पुरस्कार हुकला.