जीनो फार्मास्युटिकल्सचा प्रचारदूत असलेला फिडे मास्टर नितीश बेलुरकर याने पाचवी अखिल गोवा पातळीवरील ऑनलाइन ब्लिटझ् स्पर्धा जिंकली. सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. सासष्टीचा रित्विज परब दुसर्या स्थानी राहिला तर बार्देशच्या मंदार लाड याने तिसरा क्रमांक मिळवला. स्पर्धेचे मुख्य संचालक व लवाद म्हणून आशिष केणी यांनी जबाबदारी सांभाळली. लहशीी.लेा या संकेतस्थळाच्या मदतीने ही स्पर्धा झाली. नितीशने सातव्या फेरीत रुबन कुलासो याचा व आठव्या फेरीत अनिरुद्ध भट याचा पराभव करत दमदार प्रदर्शन केले.
नवव्या व शेवटच्या फेरीत त्याने स्कॅन्डेव्हियन डिफेन्सच्या आधुनिक प्रकाराचा वापर करत काळ्या मोहर्यांनिशी खेळूनही देवेश नाईकला बरोबरीत रोखत अपराजित कामगिरीसह जेतेपदाला गवसणी घातली.
रित्विज परबने आठव्या फेरीत आयुष शिरोडकर याचा पराभव केला. त्याने शेवटच्या फेरीत सिसिलियन डिफेन्स ग्रांप्री ऍटेकद्वारे रुबन कुलासोला गारद केले. सहाव्या फेरीत नितीशविरुद्ध झालेला पराभव वगळता त्याने चांगली कामगिरी केली. मंदार लाड याला सातव्या फेरीत रित्विजने पराजित केले. आठव्या फेरीत देवेश नाईकविरुद्धचा सामना त्याने बरोबरीत राखला. नवव्या फेरीत त्याने इंग्लिश गँबिटचा उपयोग करत गुंजल चोपडेकरला पराजित करत तिसर्या स्थानावर हक्क सांगितला. देवेश नाईकने चौथे तर साईराज वेर्णेकरने पाचवे स्थान मिळविले. सासष्टीचा उदयोन्मुख खेळाडू इथन वाझ याने सहावा क्रमांक प्राप्त केला. यानंतर श्रीलक्ष्मी कामत, गुंजल चोपडेकर, रुबन कुलासो, महेश शेट्टी, आयुष शिरोडकर, साईरुद्र नागवेकर, पार्थ साळवी, दत्ता कांबळी व विवान बाळ्ळीकर यांनी अनुक्रमे सातवा ते पंधरावा क्रमांक मिळवला.
अन्य गटवार बक्षिसे ः १५०० रेटिंगखाली ः १. श्लोक धुळापकर, शौर्य पेडणेकर, १३०० रेटिंगखाली ः १. सारस पोवार, २. साईराज नार्वेकर, सर्वोत्तम महिला १५ वर्षांवरील ः स्वेरा ब्रागांझा, ७ वर्षांखालील सर्वोत्तम मुलगा- मुलगी – शुभ बोरकर, दिया सावळ, ९ वर्षांखालील मुलगी-मुलगी ः आदित्य तांबा, वैष्णवी परब, ११ वर्षांखालील मुलगा-मुलगी ः एड्रिक वाझ, आर्या दुबळे, १३ वर्षांखालील मुलगा-मुलगी ः जॉय काकोडकर, सयुरी नाईक, १५ वर्षांखालील मुलगा-मुलगी ः आलेक्स सिकेरा, श्वेता सहकारी