ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा सध्या देशात गाजत आहे. या घोटाळ्यात माजी वायूदलप्रमुख एसपी त्यागी यांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी तीन मोठ्या व्यक्ती सीबीआयच्या रडारवर आहेत. यामध्ये माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के नारायणन, माजी एसपीजी डायरेक्टर भरतवीर वांचू आणि सीबीआयचे माजी संचालक अनिल सिन्हा यांचा समावेश आहे.
एमके नारायणन नेहरु-गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जात होते. मनमोहन सिंह सरकारमध्ये ते २००५ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले. तर यूपीए सरकारने २०११ मध्ये त्यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती.
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात सोनिया गांधींचे निकटवर्तीय समजल्या जाणार्या वांचू यांची याआधीही सीबीआयने चौकशी केली होती. तर तिसरी व्यक्ती अनिल सिन्हा हे सीबीआयचे माजी संचालक आहेत.