पतंजलीची दुकाने कॅशलेस करणार ः रामदेवबाबा

0
83

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देणार्‍या योगगुरु रामदेव बाबा यांनी पतंजलीच्या दुकानांमधील व्यवहार ‘कॅशलेस’ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले आहे.

नाताळापूर्वी सर्व दुकानांमध्ये डिजिटल स्वरुपातील व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी पाच बँकांशी संपर्क साधल्याचे स्पष्ट करून रामदेवबाबांनी, याशिवाय, पतंजलीच्या दुकानांमध्ये पन्नास रुपयांपासून पुढचे व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
पतंजलीची देशभरात ५३०० दुकाने असून या दुकानांतून केवळ पन्नास रुपयांपेक्षा कमी रकमेचे व्यवहार रोख पद्धतीने होतील. नोटाबंदीच्या निर्णयानंतर पतंजलीच्या सर्व दुकानांमध्ये गरीबांना उधारीवर वस्तू देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, अशी माहिती पतंजलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण यांनी दिली. रोख रक्कम नसल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे नुकसान होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे, असेही बाळकृष्ण यांनी सांगितले.
पाच बँकांशी संपर्क
नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर रामदेवबाबांनी लगेचच एसबीआय, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएङ्गसी बँक आणि पंजाब नॅशनल बँकेची भेट घेतली आहे. नाताळपूर्वी पतंजलीच्या देशभरातील सर्व दुकानांना सर्व बँकांशी जोडून डिजिटल व्यवहार सुरळीत करण्याचा आपला हेतू असल्याचे रामदेवबाबा म्हणाले.