ऑक्टोबरमध्ये दररोज करणार १ कोटी नागरिकांचे लसीकरण

0
41

ऑक्टोबर महिन्यात दररोज १ कोटी नागरिकांचे लसीकरण करणार असल्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्यासाठी सरकार एकूण २८ कोटी लशी खरेदी करणार आहे. या लशी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांकडून खरेदी केल्या जाणार आहेत. याशिवाय बायोलॉजिकल-ई आणि झायडस कँडिला या कंपन्यांच्या लसीदेखील भारतात उपलब्ध होणार आहेत. देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा १५ ऑक्टोबरपूर्वी पार करण्याचा सरकारचा मानस आहे. सध्याच्या लसीकरणाच्या वेगानुसार हा टप्पा १० ते १२ ऑक्टोबर दरम्यानच पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. देशात आतापर्यंत ८८ कोटींपेक्षा जास्त लसीकरण पूर्ण झाले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत देशातील ९४ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे.