कॉंग्रेस सोडणार पण भाजपमध्ये जाणार नाही ः अमरिंदर सिंग

0
35

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नाही परंतु कॉंग्रेसमध्ये राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी अपमान सहन होत नाही अशी खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे अमरिंदर सिंग नक्की कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर अमरिंदर सिंग हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती.