एसबीआयचे माजी अध्यक्ष पी. जी. काकोडकरांचे निधन

0
90

भारतीय स्टेट बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. काकोडकर (८३) यांचे काल पणजीत हृदयविकाराने निधन झाले. काकोडकर हे १९५७ साली भारतीय स्टेट बँकेच्या सेवेत रुजू झाले होते. बँकेत ४० वर्षे काम केल्यानंतर ३१ मार्च १९९७ मध्ये निवृत्त झाले. निवृत्तीच्यावेळी ते बँकेचे अध्यक्ष होते. काकोडकर यांनी गोवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून १९९७ ते ९९ पर्यंत काम केले. ते गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय समितीवरही होते. त्यांच्या निधनावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दुःख व्यक्त केले आहे.