कॉंग्रेसकडून विश्‍वासघात दिनाचे आयोजन

0
253

>> नोटाबंदीला चार वर्षे पूर्ण

चार वर्षांपूर्वी दि. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटाबंदी जाहीर केली. त्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस पक्षाने काल रविवार दि. ८ रोजी राष्ट्रीय स्तरावर विश्‍वासघात दिनाचे आयोजन केल्याचे काल विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी दिगंबर कामत म्हणाले की, ही नोटाबंदी म्हणजे नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतभरातील लोकांचा केलेला विश्‍वासघात होता. कुणालाही काहीही कळू न देता अत्यंत गुप्तपणे अचानक त्यांनी एका रात्रीत नोटाबंदी जाहीर केल्याने देशातील लोकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. या नोटबंदीमुळे देशाचा काय फायदा झाला हे मोदी व भाजप सांगू शकले नाही.

गिरीश चोडणकर म्हणाले की, गेल्या चार वर्षांत मोदी यांच्या नोटाबंदीचा पूर्ण फज्जा उडाला असल्याचे या चार वर्षांच्या काळात सिद्ध झाले असल्याचे चोडणकर म्हणाले. नोटाबंदी करुन मोदी यांनी एका फटक्यात लाखो युवकांच्या स्वप्नांचा चुराडा केला.