मुख्यमंत्र्यांना आलेल्या फोनवरूनच आणखी दोघांना धमकीचे संदेश

0
233

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ज्या मोबाईल क्रमांकावरून खंडणीसाठी एसएमएस आला त्याच मोबाईल क्रमांकावरून आणखी दोघांना धमकी व खंडणीसाठी संदेश आला आहे. दरम्यान, पणजी पोलिसांनी या धमकी व खंडणीच्या संदेश प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर हा धमकी व खंडणी मागणारा संदेश आलेला आहे. त्याचबरोबर गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत आणि प्रणव सावर्डेकर यांनाही धमकी व खंडणीसाठी तशाच प्रकारचा संदेश आला आहे.

गुदिन्होंनाही धमकी,
संशयितास ताब्यात

वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांना धमकी व खंडणीसाठी संदेश पाठविणार्‍या एका संशयिताला दक्षिण गोवा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मंत्री गुदिन्हो यांनी वास्को पोलीस स्थानकावर तक्रार केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देण्यात आलेल्या धमकी व खंडणी संदेशशी संशयिताचा काही संबंधी आहे का, यासंबंधी तपास केला जात आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.