एलईडी बल्ब योजनेत घोटाळा

0
98

>> अपक्ष आमदारांचा हल्लाबोल; सरकारला न्यायालयात खेचण्याचा इशारा

 

सरकारने एलईडी बल्ब वितरण कार्यक्रम आयोजित करताना सरकारी कामकाज नियमांचा भंग केला आहे. हे कार्यक्रम म्हणजे भाजपचे मेळावे आहेत. सरकारी यंत्रणेचा पूर्णपणे गैरवापर होत असल्याचा आरोप करीत या प्रकरणी लोकायुक्तांकडे व गरज भासल्यास उच्च न्यायालयात याचिका सादर करणार असल्याचा इशारा आमदार विजय सरदेसाई, रोहन खंवटे व नरेश सावळ यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत काल दिला.
‘आप’ला गोव्यात विशेष स्थान नाही. परंतु त्यांच्या येथील प्रवेशामुळे भाजप गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शंभर रुपयांना तीन मिळणारे बल्ब जनतेला मोफत देऊन जनतेला लाचार करण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या बल्बांवर ‘आयएसआय मार्क’ही नाही. दिल्लीतील उद्योजकाला मदत करण्यासाठीच प्रत्यक्षात रस्त्यावर अंधार करणार्‍या भाजप सरकारने वरील योजना तयार केल्याची टीका वरील आमदारांनी केली. विरोधक एकत्र येत असल्याची चाहूल लागल्याने भाजपच्या पायाखालील वाळू सरकू लागल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. या सरकारला धोरणच नसल्याचे ते म्हणाले. वीज ग्राहकाला अधिक वीज पंखे, ङ्ग्रीज, वॉशिंग मशीन व मिक्सर यासाठी लागते. याचे सरकारला भान नाही. तीन बल्ब मोङ्गत देऊन विजेची बचत होईल याला अर्थ नाही. ग्राहकांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार असल्याचे सरदेसाई म्हणाले.
स्थानिक आमदारांना बरोबर न घेता सरकार बल्ब वितरण कार्यक्रम आयोजित करीत आहेत. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर लोकशाहीचा आदर करीत नसल्याचा आरोप आमदार नरेश सावळ यांनी केला. तीन बल्ब मोङ्गत वितरित करण्यापेक्षा सरकारने ग्राहकांच्या वीज बिलातील ५० रुपये कमी केले असते तर त्याचा फयदा झाला असता, असे सावळ यांनी सांगितले. ग्राहकांना वितरित करण्यात आलेले बल्ब कोणत्या कंपनीचे ते कळण्यास मार्ग नाही, असे सांगून सरकार जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप खंवटे यांनी केला.