एलईडी पथदीप, रस्ते दुरुस्तीचे आश्‍वासन हवेत विरले ः कॉंग्रेस

0
109

गेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधकांनी राज्यातील दुरवस्था झालेले रस्ते व एलईडी पथदीप पेटत नसल्याने सर्वत्र होणार्‍या अंधाराच्या प्रश्‍नावर आवाज उठवल्यानंतर सरकारने चतुर्थीपूर्वी राज्यभरातील खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याचे व सर्वत्र नवे पथदीप बसवण्याचे आश्‍वासन दिले होते. पण हे आश्वासन हवेतच विरुन गेल्याचा आरोप काल विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

चतुर्थी आता दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना राज्यभरातील रस्त्यांच्या डागडुजीचे काम सरकारने हाती घेतले नसल्याचे सांगून सरकारला सर्वसामान्य जनतेशी काहीही देणे घेणे काही हे यावरुन दिसून येत असल्याचे कामत म्हणाले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊस्कर यांनी रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे व वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी राज्यभरात एलईडी पथदीप बसवण्याचे आश्वासन दिले होते, असे कामत यांनी यावेळी सांगितले. काब्राल यानी चतुर्थीपूर्वी प्रत्येक मतदारसंघासाठी ४०० एलईडी पथदीप देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा त्यांना विसर पडता काय, असा प्रश्‍नही कामत यांनी केला.

चाळीसही मतदारसंघातील रस्ते पूर्णपणे खराब झालेले असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असल्याचे आपण सभागृहाच्या नजरेत आणून दिले होते व राज्यातील जर कुठल्याही एका मतदारसंघातील रस्ते जर चांगले असतील तर संबंधीत आमदाराने सांगावे, अशी सूचना केली होती. पण त्यावेळी कुणीही आपल्या मतदारसंघातील रस्ते चांगले असल्याचे सांगितले नव्हते, असे कामत यांनी नजरेत हाणून दिले.

पूल, साकवही मोडकळीस
राज्यातील बरेच पूल व साकवही मोडकळीस आलेले असून त्यांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ व्हायला हवे, अशी मागणीही आपण केली होती. याची कामत यांनी आठवण करुन दिली. कोलवाळ व बोरी येथील पूल मोडकळीस आले असल्याच्या तक्रारी असून काही लोकांनी त्याविषयीची छायाचित्रे व व्हिडिओही आपणाला पाठवले असल्याची माहिती कामत यांनी यावेळी दिली.

जलवाहिनींच्या जाळ्याचेही
ऑडिट व्हायला हवे
पूल व साकव यांच्याबरोबरच राज्यातील जलवाहिनींचे जे जाळे आहे त्याबाबतही ऑडिट व्हायला हवे. काही काही जलवाहिन्या कुठे जाऊन कुठे मिळालेल्या आहेत हे कळायला मार्ग नाही, असे सांगून अशा वाहिन्या जेव्हा फुटतात तेव्हा त्या दुरुस्त करण्याबाबती त्यामुळे अडचणी येऊ शकतात असे कामत म्हणाले.

भडकलेल्या भाज्यांच्या
दरांवर उपाय काढा
बेळगांव, कोल्हापूरसह विविध भागांत आलेल्या पुरामुळे राज्यात भाजीचे दर गगनाला भिडलेले असून चतुर्थीच्या काळात मागणी वाढणार असल्याने दर आणखी भडकू शकतात, अशी भीती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली. चतुर्थीच्या दिवसांत राज्यातील लोकांना सवलतीच्या दरात भाजी मिळवून देण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आपण काल मडगांव येथील गांधी मार्केटमध्ये जाऊन भाजीच्या दरांची माहिती मिळवली. दर खूपच भडकलेले आहेत. तूर डाळ ११० रु. किलो, भेंडी भाजी १०० रु., तेंडली १०० रु., हरभरे ९० रु., वाटाणे ८० रु., वालपापडी ७० रु. असे कामत यांनी माहिती देताना सांगितले. गेल्या वर्षीच्या