एनओसीअभावी राज्यातील ४१ विकासकामे रखडली

0
136

गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन खात्याची सुमारे ४१ विकासकामे केवळ ना हरकत दाखल्याच्या (एनओसी) अभावामुळे रखडली आहेत. किनारी व्यवस्थापन आराखडा तयार न केल्यास किनारी भागातील विकास कामावर विपरीत परिणाम होणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी विधानसभेत सुदिन ढवळीकर यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना काल दिली.

पर्यटन खाते आणि पर्यटन विकास महामंडळाने विकासकामे तयार करण्यापूर्वी संबंधितांकडून ना हरकत दाखले घेतले असते तर विकासकामांवर विपरीत परिणाम झाला नसता. तसेच सरकारी खात्यांमधून सुद्धा ना हरकत दाखल्यासाठी कामे प्रलंबित राहत आहेत, असे ढवळीकर यांनी सांगितले.

सरकारी खात्यांमधील ना हरकत दाखल लगेच मिळविण्यासाठी त्वरित उपाय योजना केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पर्यटन विकास महामंडळाकडून किनारी भागातील विकास कामांचे आराखडे तयार करून स्वदेश दर्शन योजनेच्या निधीसाठी प्रस्ताव पाठविले जातात, असे आजगावकर यांनी सांगितले.