Home बातम्या एनएसयूआय-गोवा फॉरवर्डचा विद्यापीठ निवडणुकीत विजय

एनएसयूआय-गोवा फॉरवर्डचा विद्यापीठ निवडणुकीत विजय

0

गोवा विद्यापीठ राज्यस्तरीय निवडणुकांत अभाविपचा पराभव करीत काँग्रेसच्या एनएसयूआय व गोवा फॉरवर्डच्या विद्यार्थी संघटनेने विजय मिळवला. एनएसयूआय व गोवा फॉरवर्डच्या संयुक्त पॅनलने 95 पैकी 52 मते मिळवत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव केला. राज्यस्तरीय विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी साई देसाई यांची निवड झाली आहे. त्यांच्या या विजयाबद्दल गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर व विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव तसेच गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते विजय सरदेसाई यानी अभिनंदन केले आहे.गोवा विद्यापीठाची राज्यस्तरीय निवडणूक ही 16 डिसेंबर रोजी होणार होती; परंतु निवडणुकीला अवघी 15 मिनिटे बाकी असताना जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करून ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्याचा विरोधी त्यावेळी काँग्रेसच्या प या विद्यार्थी संघटनेने केला होता.