उमेदवाराला प्रचारासाठी ४० हजारांची खर्च मर्यादा

0
14

>> ग्रामपंचायत निवडणूक; घरोघरी प्रचार

ाज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागातील उमेदवारासाठी ४० हजार रुपये खर्च मर्यादा निश्‍चित करण्यात आलेली आहे.
राज्यातील १८६ ग्रामपंचायतीमधून ५०३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. येत्या १० ऑगस्ट २०२२ रोजी मतदान घेतले जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांनी घरोघरी भेट देऊन प्रचाराला प्रारंभ केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना खर्चाची नियमितपणे नोंदणी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. उमेदवारांना खर्चाची नोंदणी करण्यासाठी पुस्तिका देण्यात आली आहे. उमेदवारांना त्या पुस्तिकेत दरदिवशीचा खर्च नोंद करावा लागत आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणूक मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
ग्रामपंचायत क्षेत्रात दुरंगी, तिरंगी, बहुरंगी लढती अपेक्षित आहेत. ग्रामपातळीवरील निवडणुकीत मतदान जास्त प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.