उमेदवारांना ४ दिवसांत ओबीसी प्रमाणपत्र

0
16

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची विधानसभेत माहिती

पंचायत निवडणुका लढवण्यासाठी ज्या कुणाला ओबीसी प्रमाणपत्र हवे असेल, ते त्यांना चार दिवसांच्या आत मिळेल, अशी सोय करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली. सरकारकडून हे प्रमाणपत्र देण्यास विलंब केला जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काल शून्य प्रहराला आमदार संकल्प आमोणकर यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला होता. सरकारकडून ओबीसी प्रमाणपत्र मिळत नसल्याने पंचायत निवडणूक रिंगणात उतरू पाहणार्‍यांची मोठी गैरसोय होत असल्याचे आमोणकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र हवे असते, त्यांना आपल्या जातीतील धुरिणांकडून ते आपल्या जातीतील असल्याचे प्रमाणपत्र आणून सरकारकडे सुपूर्द करावे लागते; मात्र त्यांना आपल्या ह्या धुरिणांकडून तसे प्रमाणपत्र मिळवण्यास अडचणी येतात. त्यांच्यातील हेवेदाव्यांमुळे त्यांना ते प्रमाणपत्र मिळण्यास विलंब लागतो.

सरकार मात्र निवडणुकीसाठी अशी प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी येणार्‍यांना विनाविलंब म्हणजेच चार दिवसांत ओबीसी प्रमाणपत्र देण्याची सोय करते, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला.