उपसभापतिपदी जोशुओ डिसोझा

0
14

काल राज्य विधानसभेत उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे उमेदवार जोशुआ डिसोझा यांचा विजय झाला. डिसोझा यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार डिलायला लोबो यांचा २४ विरुद्ध १२ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस व क्रुझ सिल्वा तसेच रेव्हुलेशनरी गोवन्स पक्षाचे उमेदवार वीरेश बोलकर यांनी तटस्थ राहणे पसंत करत कुणालाही मत दिले नाही. तर ११ कॉंग्रेस आमदार व गोवा फॉरवर्ड पक्षाचे उमेदवार विजय सरदेसाई यांनी विरोधकांच्या उमेदवार डिलायला लोबो यांना मतदान केले.

सत्ताधारी पक्षाचे उमेदवार जोशुआ डिसोझा यांचे नाव गणेश गांवकर यांनी सुचवले तर कृष्णा साळकर यांनी अनुमोदन दिले. विरोधी पक्षाच्या उमेदवार डिलायला लोबो यांचे नाव आमदार कार्लुस फेरेरा यांनी सुचवले तर आमदार विजय सरदेसाई यांनी अनुमोदन दिले. आम आदमी पक्षाचे दोन आमदार व रेव्हुलेशनरी गोवन पक्षाचा एक आमदार यांनी तटस्थ राहणे पसंत केल्याने डिलायला लोबो यांना ३ मते कमी मिळाली.