Home बातम्या उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळेवाहतूक व्यवस्थेत बदल

उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळेवाहतूक व्यवस्थेत बदल

0

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या गोवा दौऱ्यामुळे शुक्रवार दि. 29 आणि शनिवार दि. 30 मे रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. दि. 29 रोजी संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आणि 30 मे रोजी दुपारी 2.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत दाबोळी विमानतळ, चिखली, कुठ्ठाळी, नवीन झुआरी पूल ते बांबोळी-दोनापावल दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. रस्ता बंदच्या काळात रुग्णवाहिका आणि आपत्कालीन वाहनांना वाहतूक करण्यात मान्यता दिली जाणार आहे. दि. 30 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दोनापावल लोकभवन ते कला अकादमीपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. या काळात अंतर्गत रस्त्यावरून वाहने वळविली जाणार आहेत, असे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.