उपनिरीक्षकासह चार पोलीस निलंबित

0
103

कळंगुट पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक जतीन पोतदार, हवालदार नीलेश साळगावकर व पांडुरंग सामंत यांना गृहखात्याने एका आदेशाद्वारे निलंबित केले आहे. वरील पोलीस कर्मचार्‍यांवर संचारबंदी काळात काही नागरिकांकडून खंडणी वसूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

दरम्यान, फोंडा येथील पोलीस वाहतूक कक्षाचे साहाय्यक उपनिरीक्षक अजित गावकर यांनाही निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यावर ढवळी-फर्मागुडी महामार्गावर पार्क केलेल्या ट्रकांमधून मोबाईल संच व रोख रक्कम पळविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी ट्रक मालकाने अजित गावकर याला मारहाण केल्याचीही घटना यावेळी घडली होती. तर कळंगुटमध्ये संचारबंदीच्या काळात नियमांचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी नागरिकांकडून पैसे उकळले तसेच मारहाण केल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेत तपास करण्यात आला. यावेळी नागरिकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.