उन्नाव, कठुआप्रकरणी नामवंतांकडून संताप

0
68

उन्नाव येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार तसेच जम्मू काश्मीरमधील कठुआ येथील ८ वर्षीय बालिकेची बलात्कारानंतर निर्घृण हत्याप्रकरणांमुळे देशभरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रातील दिग्गजांनी विविध माध्यमांतून संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीर, स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चिमुरड्या मुलीवरील निर्घृण अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही आता उठणार नाही काय? आम्हाला असाच भारत अभिप्रेत आहे काय? असे सवाल सायना मिर्झाने उपस्थित केले आहेत. तर गौतम गंभीरने उन्नाव प्रकरणामुळे भारतीय सद्सद्विवेकबुद्धीवरच बलात्कार झाल्याचे म्हटले आहे. अभिनेत्री सोनम कपूर, क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, अभिनेता रितेश देशमुख, रेणुका शहाणे, फरहान अख्तर व अन्य अनेक बॉलिवूड कलाकारांनी या घटनांबद्दल संताप व्यक्त केला आहे.