उगवे – पेडणे येथील अपघातात महिला ठार

0
238

उगवे पेडणे येथे स्कूटर व कार यांच्यात काल दि. २३ रोजी झालेल्या अपघातात पेठेचावाडा कोरगाव येथील शोभा नारायण शेट्ये (४६) ही महिला ठार झाली. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहनचालक सागर सयाजी पाटील (२८, सांगली) याला पेडणे पोलिसांनी अटक केली. कोरगाव येथील शोभा शेट्ये ही आपल्या ऍक्टिवाने (जीए ११ बी ९७६०) उगवे पेडणे येथे भाऊबिजेला जात होती. त्यावेळी त्याच दिशेने जाणार्‍या तावेरा (एमएच ०९ बीएच ९८८९) या वाहनाने दुचाकीला मागच्या बाजूने ठोकर दिल्याने शोभा ही गंभीर जखमी झाली. तिला तुये इस्पितळात उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.