ई-स्टॅम्पिंग प्रक्रिया पुढील महिन्यापासून : महसूलमंत्री

0
10

राज्य सरकार स्टॅम्प पेपरसाठी ई-स्टॅम्पिंग प्रक्रिया पुढील महिन्यापासून सुरू करणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी राज्य सरकारच्या गोवा ई-स्टॅम्पिंग नियम 2022 ची अंमलबजावणी आणि ई-स्टॅम्प प्रणाली प्रक्रियेच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
स्थानिक मुद्रांक विक्रेत्यांना ई-स्टॅम्पिंग प्रणालीचा भाग बनवण्यात येणार आहे. विक्रेत्यांशी पुढील आठवड्यात चर्चा केली जाणार आहे. ई-स्टॅम्पिंग प्रणाली भारत सरकारच्या स्टॉकहोल्डिंग कंपनीद्वारे कार्यान्वित केली जाईल. या कंपनीने इतर 23 राज्यांमध्ये समान प्रणाली कार्यान्वित केली आहे.
ई-स्टॅम्पिंग प्रक्रियेमुळे कामकाजात अधिक पारदर्शकता येईल आणि सेवा आठवड्याचे सात दिवस आणि चोवीस तास वापरता येऊ शकते, असे मोन्सेरात यांनी सांगितले.