ईडीसीला 2022-23मध्ये 62.35 कोटींचा फायदा

0
19

गोवा आर्थिक विकास मंडळाच्या (ईडीसी) संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री तथा ईडीसीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली आहे. ईडीसीला आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सुमारे 62.35 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. या बैठकीत ईडीसीच्या आर्थिक बाबींना मान्यता देण्यात आली आहे. वर्ष 2022-23 साठी 100.92 लाख रुपयांच्या लाभांशाची शिफारस करण्यात आली आहे. ईडीसीला 2021-22 या वर्षी 53.42 कोटी रुपयांची नफा झाला होता. मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली कर्ज योजना आणखी सुटसुटीत करण्याची शिफारस करण्यात आली आहे. उद्योगासाठीच्या कर्ज योजनेची प्रक्रिया सुटसुटीत करून कर्ज मान्यता प्रक्रिया जलदगतीने करावी, अशीही शिफारस करण्यात आली आहे.