Home Featured इराणवरील हल्ल्यासंदर्भात विविध देशांच्या प्रतिक्रिया

इराणवरील हल्ल्यासंदर्भात विविध देशांच्या प्रतिक्रिया

0

रशियाकडून निषेध
मॉस्को : अमेरिका-इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेल्यानंतर या हल्ल्याचा रशियाने निषेध केला आहे. इराणचा मित्र रशियाने या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. रशियन राजदूत वासिली नेबेंजिया यांनी इशारा दिला की, इराणवरील हा हल्ला प्रदेशातील तणाव वाढवणारा आहे आणि तो सीमांच्या बाहेरही पसरू शकतो असा इशारा दिला आहे.

ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल्बुसैदी यांनी मी खूप निराश आहे. सध्या सुरू असलेल्या गंभीर आणि सक्रिय चर्चेला पुन्हा एकदा बिघडवण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेचा कोणताही फायदा होणार नाही आणि जगात शांतताही येणार नाही. मी त्या निष्पाप लोकांसाठी प्रार्थना करतो ज्यांना याचा परिणाम भोगावा लागेल. मी अमेरिकेला आवाहन करतो की त्यांनी यात आणखी अडकू नये असे म्हटले आहे.

इराणला पूर्ण हक्क
द्या ः जर्मनी

जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी, इराणी लोकांना त्यांच्या नशिबाचा निर्णय घेण्याचा पूर्ण हक्क आहे. जर्मन सरकार सध्या अमेरिका, इस्रायल आणि प्रदेशातील इतर भागीदारांच्या सतत संपर्कात आहे. सरकार या प्रदेशात शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि इस्रायलच्या सुरक्षेबाबत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले आहे.

खामेनी क्रूर ः अमेरिका
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, इतिहासातील सर्वात क्रूर लोकांपैकी एक, खामेनी आता मरण पावला आहे. हा केवळ इराणच्या लोकांसाठीच नव्हे, तर त्या महान अमेरिकन लोकांसाठी आणि जगातील अनेक देशांतील त्या लोकांसाठीही न्याय आहे, ज्यांना खामेनी आणि त्याच्या रक्तपिपासू गुंडांनी मारले किंवा अपंग केले होते. इस्त्रायलसोबत मिळून केलेल्या या मोहिमेमध्ये तो किंवा त्याच्यासोबत मारले गेलेले इतर नेते काहीही करू शकले नाहीत. इराणी लोकांसाठी आपला देश परत मिळवण्याची ही सर्वात मोठी आणि एकमेव संधी असल्याचे म्हटले आहे.

चर्चा करावी ः फ्रान्स, ब्रिटन
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी एका संयुक्त निवेदनात इराणला चर्चेचा मार्ग निवडण्यास सांगितले. आम्ही या हल्ल्यांमध्ये भाग घेतला नाही, परंतु आम्ही अमेरिका आणि इस्रायलच्या संपर्कात आहोत. इराणने चर्चेचा मार्ग निवडावा असे आवाहन त्यांनी केले.