इम्फाळमधील शक्तीशाली बॉम्बस्फोटात ३ ठार : २३ जखमी

0
225

येथील एका मार्केट संकुलात काल संध्याकाळी झालेल्या एका बॉम्ब स्फोटात तिघेजण जागीच ठार झाले, तर २३ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार बॉम्ब स्फोटाची घटना संध्या. ६ वा. च्या सुमारास झाली. जखमींना रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.