इफ्फीसाठी प्रतिनिधी नोंदणीला सुरूवात

0
250

>> यंदा ऑनलाइन महोत्सव

राज्यात जानेवारी २०२१ मध्ये होणार्‍या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली आहे.
इफ्फी गोवाच्या संकेत स्थळावर प्रतिनिधी नोंदणीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. व्यावसायिक, चित्रपटप्रेमींसाठी १ हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे या वर्षीचा इफ्फी ऑनलाइन आणि थेट कार्यक्रम अशा दोन्ही स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. या चित्रपट महोत्सवासाठी मर्यादित प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.