इंडियन पॅनोरमाच्या प्रवेशिका स्वीकृती प्रक्रियेस प्रारंभ

0
84

येत्या नोव्हेंबर महिन्यात गोव्यात होणार्‍या ४८ व्या इफ्फी महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागासाठी प्रवेशिका स्वीकारण्याची प्रक्रिया चित्रपट महोत्सव संचालनालयाने सुरू केली आहे, असे इफ्फीचे संचालक सी. सेंथील राजन यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
२६ फिचर फिल्म व २१ बिगर फिचर फिल्म्सची निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंडियन पॅनोरमा विभागासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्ट अशी असल्याचे राजन यांनी सांगितले. १ सप्टेंबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या काळात केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र लाभलेले चित्रपट या विभागासाठी पात्र ठरतील. मात्र, याच काळातील प्रमाणपत्र नसलेले चित्रपटही पात्र ठरू शकणार आहेत. चित्रपटांना इंग्रजी सबटायटत्स आवश्यक आहेत.
अर्जदाराने पाठवलेले ऑनलाईन अर्ज तसेच प्रिंट केलेली हार्ड कॉपी एकच असायला हवी. अर्जदाराला अर्ज व शुल्क ऑनलाईन पाठवणे सक्तीचे आहे.
दरम्यान, इफ्फीसाठीची प्रतिनिधी नोंदणी १ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.