आर्ले बुलेट शोरूमजवळ टिपर ट्रक व मारुती व्हॅन या वाहनांच्या अपघातांत व्हॅनचालक शेख अब्बास (२६) हा तरुण गंभीर जखमी झाला. काल सकाळी दोन्ही वाहने मडगावच्या दिशेने येत होती.
टिपरला मागे टाकून पुढे येण्याच्या तयारीत असताना व्हॅनची धडक टिपरला बसली. जखमी अब्बासला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळांत उपचारासाठी दाखल केले आहे.