आय. डी. शुक्ला गोव्याचे नवे पोलीस महासंचालक

0
43

गोव्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून आय. डी. शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक मुकेशकुमार मिना यांची नवी दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे. नवे पोलीस महासंचालक शुक्ला यांनी गोव्यात यापूर्वी काम केलेले आहे. दरम्यान, दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग (आयपीएस) यांची नवी दिल्ली येथे बदली करण्यात आली असून युवा व्यवहार खात्याच्या उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.