केंद्र सरकारने राज्यातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काल जारी केला. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी मामू हागे (आयएएस) यांची अरुणाचल प्रदेशात बदली करण्यात आली आहे. गोव्यातील आयएएस अधिकारी मायकल डिसोझा यांची लडाख आणि ज्योती कुमार यांची अंदमान येथे बदली करण्यात आली आहे, तर आयएएस अधिकारी संजय गोयल यांची दिल्लीतून गोवा आणि अंकिता मिश्रा यांची दिल्लीतून गोव्यात बदली करण्यात आली आहे. राज्यातील आयपीएस अधिकारी शिवेंद्ू भूषण यांची मिझोराम, शेखर प्रभुदेसाई यांची अरुणाचल प्रदेश येथे बदली केली आहे. आयपीएस अधिकारी अक्षत कौशल यांची दिल्लीतून गोव्यात बदली करण्यात आली आहे.