91 मृतदेहांची ओळख पटेना

0
1

ओडिशा रेल्वे अपघातातील अद्याप 91 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. असे अनेक मृतदेह आहेत ज्यांवर अनेक कुटुंबांचा दावा आहे. अपघातानंतर अनेक जण बेपत्ता असून, त्यांच्या नातेवाईकांच्या शोधासाठी रुग्णालय, पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत. ज्ञात मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीद्वारे केली जाईल. मृतदेहाचा दावा करणाऱ्या नातेवाईकांचे 30 डीएनए नमुने दिल्ली एम्समध्ये पाठवले जातील. येथून सात ते आठ दिवसांत अहवाल येईल. अहवालानंतरच संबंधित मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.