आयईएस, आयएसएस परीक्षांच्या मुलाखतींच्या तारखा जाहीर

0
137

केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय आर्थिक सेवा (आयईएस) आणि भारतीय सांख्यिकी सेवा (आयएसएस) परीक्षा २०२० चे मुलाखत वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. हे मुलाखत वेळापत्रक अधिकृत वेबसाइट र्ीिील.र्सेीं.ळप वर जारी केले गेले आहे. १९ जुलै ते २२ जुलै २०२१ या कालावधीत यूपीएससीकडून आयईएस आणि आयएसएस परीक्षांच्या मुलाखती दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहेत. अगोदर या मुलाखती १९ ते २३ एप्रिल २०२१ दरम्यान होणार होत्या. सध्या कोरोना परिस्थिती आणि इतर गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर आयोगाकडून मुलाखत चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.