आमदार प्रसाद गावकर यांचा तृणमूल कॉंग्रेसला पाठिंबा

0
25

सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी तृणमूल कॉंग्रेस पक्षाला (टीसीपी) पाठिंबा काल जाहीर केला आहे. आमदार गावकर लवकरच टीसीपीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षात सांगे मतदारसंघाच्या विकासासाठी भाजप सरकारला पाठिंबा देऊनसुद्धा विकासकामांना चालना मिळाली नाही. त्यामुळे गावकर नाराज होते. गावकर हे कॉँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा होती. तथापि, आमदार गावकर यांनी टीसीपीला पाठिंबा जाहीर केला.