माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल

0
36

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने काल त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांची तब्येत बरी असल्याचे सूत्रांनी माहिती देताना सागितले. डॉ. सिंग यांना या वर्षी कोरोनाचा संसर्ग झाला होता.