‘आप’ आमदार राष्ट्रपतींना  भेटले; निवडणुकांची मागणी

0
102

दिल्लीत सरकार बनविण्यासाठी भाजप आमदार फोडू पाहत असल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीच्या आमदारांनी काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली व नव्याने विधानसभा निवडणुकांची मागणी केली. दरम्यान, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाला सरकार बनविण्यासाठी निमंत्रणाचे संकेत दिले होते. सध्या दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू आहे.