Home अंगण आपली जैवविविधता जपूया!

आपली जैवविविधता जपूया!

0
  • श्रीरंग व्यंकटेश जांभळे

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश जैवविविधतेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. ‘स्थानिक पातळीवरील कृतीद्वारे जागतिक परिणाम’ ही 2026 या वर्षीची थीम आहे. ही थीम स्थानिक स्तरावर केलेल्या पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण जगावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो हा संदेश देते.

जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या सजीवांची विविधता. यामध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव तसेच त्यांच्या अधिवासांचा समावेश होतो. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जैवविविधता अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक सजीव निसर्गाच्या चक्रात आपली वेगळी भूमिका बजावतो. अन्न, औषधे, इंधन, कपडे या व अशा आपल्या इतर अनेक गरजा जैवविविधतेमुळे पूर्ण होतात. जैवविविधता ही एक व्यापक संकल्पना आहे. ती तीन स्तरांवर दिसून येते :
(1) जनुकीय विविधता ः एकाच प्रजातीमधील सजीवांच्या जनुकांमध्ये (ॠशपशी) असलेली विविधता.
(2) जाती विविधता ः एखाद्या प्रदेशात आढळणाऱ्या विविध प्रजातींमध्ये असलेली विविधता. आणि
(3) परिसंस्था विविधता ः जंगल, महासागर, वाळवंट अशा विविध परिसंस्था आणि त्यांच्यातील सजीवांचा अधिवास.
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश जैवविविधतेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. ‘स्थानिक पातळीवरील कृतीद्वारे जागतिक परिणाम’ ही 2026 या वर्षीची थीम (ींहशाश) आहे. ही थीम स्थानिक स्तरावर केलेल्या पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण जगावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो हा संदेश देते. ही थीम जैवविविधतेची हानी थांबवण्यासाठी आणि ती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी स्थानिक स्तरावरील बांधिलकी आणि कृती यांचे महत्त्व अधोरेखित करते. तसेच, कुन्मिंग-मॉन्ट्रियल जागतिक जैवविविधता आराखड्याची (र्घीपाळपस-चेपीींशरश्र ॠश्रेलरश्र इळेवर्ळींशीीळूीं ऋीराशुेीज्ञ) उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शासनाच्या पुढाकारासोबत जनसहभाग आवश्यक असल्याचा संदेश देते. त्याचा उत्सव अवघ्या दोन दिवसांपूर्वी विविध ठिकाणी साजरा करण्यात आला.

जैवविविधतेसाठी संयुक्त राष्ट्रसंघ व भारताची भागीदारी
जगभरातील जैवविविधतेचे संरक्षण आणि त्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ विविध उपक्रम राबवते. त्यांपैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, जो दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो. पृथ्वीवरील वनस्पती, प्राणी आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्यासाठी तसेच जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ विविध जागतिक उपक्रम राबविते. जैवविविधता करार (उेर्पींशपींळेप ेप इळेश्रेसळलरश्र ऊर्ळींशीीळूीं – उइऊ) 1992 मध्ये रिओ परिषदेत स्वीकारण्यात आला. या करारावर जगातील बहुतेक देशांनी स्वाक्षरी केली आहे. सध्या जवळपास 196 देश आणि युरोपियन संघ हे या कराराचे सदस्य आहेत. या कराराचा उद्देश जैवविविधतेचे संरक्षण, संसाधनांचा शाश्वत वापर आणि जैविक संसाधनांमधून मिळणाऱ्या फायद्यांचे न्याय्य वाटप हा आहे.
जैवविविधता संरक्षण हे शाश्वत विकास उद्दिष्टांशी (उद्दिष्ट 14- पाण्याखालील जीवन) आणि (उद्दिष्ट 15- जमिनीवरील जीवन) थेट संबंधित आहे.

1992 मध्ये झालेल्या पृथ्वी परिषदेनंतर भारताने उइऊ करार स्वीकारला. भारत सरकारने जैवविविधतेचे संरक्षण, जैवसंपत्तीचा शाश्वत वापर आणि स्थानिक समुदायांच्या पारंपरिक ज्ञानाचे रक्षण करण्यासाठी 2002 मध्ये जैवविविधता कायदा (इळेश्रेसळलरश्र ऊर्ळींशीीळूीं अलीं, 2002) लागू केला. हा कायदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या जैवविविधता करारानुसार तयार करण्यात आला. या कायद्याद्वारे देशातील वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांसारख्या जैवसंपत्तीचे संवर्धन करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच परदेशी संस्था किंवा व्यक्तींना भारतातील जैवसंपत्ती आणि पारंपरिक ज्ञान वापरण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (छइअ), राज्य जैवविविधता मंडळे आणि स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्या (इचउी) स्थापन करण्यात आल्या आहेत.

जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची भूमिका
भारताच्या जैवविविधता कायदा, 2002 अंतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्या (इळेवर्ळींशीीळूीं चरपरसशाशपीं उेााळीींंशशी) स्थापन करण्याची तरतूद आहे. राज्य जैवविविधता मंडळाच्या मार्गदर्शनाखाली या समित्या काम करतात. गोवा राज्यातही या समित्या ग्रामपंचायत आणि नगरपरिषद स्तरावर कार्यरत आहेत. जैवविविधता व्यवस्थापन समित्यांचे मुख्य कार्य म्हणजे स्थानिक पातळीवरील जैवविविधतेचे संरक्षण करणे, पारंपरिक ज्ञानाची नोंद ठेवणे आणि नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे.
गोवा हा किनारपट्टी, खारफुटी, नद्या आणि जैवसमृद्ध वनक्षेत्र असलेला प्रदेश असल्यामुळे येथे जैवविविधतेचे संवर्धन विशेष महत्त्वाचे आहे. या समित्या लोकांची जैवविविधता नोंदणी (झशेश्रिश’ी इळेवर्ळींशीीळूीं ठशसळीींशी – झइठ) तयार करतात, ज्यामध्ये स्थानिक वनस्पती, प्राणी, औषधी वनस्पती आणि पारंपरिक पर्यावरणीय ज्ञानाची नोंद केली जाते. यात स्थानिक भागात आढळणारे प्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पतींच्या दुर्मीळ किंवा स्थानिक प्रजातींची यादी तयार करणे तसेच स्थानिक पीक पद्धती, पाळीव जनावरे आणि परिसराचा पर्यावरणीय इतिहास नोंदवणे ही कामे लोकसहभागातून केली जातात. यामुळे स्थानिक जैवसंपत्तीची अधिकृत माहिती उपलब्ध होते आणि तिचे संरक्षण सोपे होते. लुप्तप्राय होत चाललेल्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्थानिक लोकांच्या जैविक संसाधनावरील हक्कांचे रक्षण करणे आणि त्यावरील ज्ञानाचा व्यावसायिक वापर झाल्यास स्थानिकांना त्याचा फायदा मिळवून देणे याच्या माध्यमातून शक्य होते.

जैवविविधतेने समृद्ध गोवा

गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य असले तरी जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे. पश्चिम घाटाच्या जैवविविधता हॉटस्पॉटचा एक भाग असल्यामुळे येथे वनस्पती, प्राणी, पक्षी, सागरी जीव आणि सूक्ष्मजीव यांची मोठी विविधता आढळते. किनारपट्टी, नद्या, खारफुटी, सदाहरित जंगले आणि डोंगराळ प्रदेश यांचा संगम असल्यामुळे गोव्यात विविध परिसंस्था (शलूेीीींशाी) विकसित झाल्या आहेत. या विविध परिसंस्थांमुळे गोवा लहान पण जैवसमृद्ध राज्य म्हणून ओळखले जाते. गोव्याच्या जंगलांमध्ये सदाहरित आणि अर्धसदाहरित वनस्पती मोठ्या प्रमाणावर आढळतात. येथे आंबा, फणस, जांभूळ, काजू यांसारखी स्थानिक झाडे तसेच औषधी वनस्पतींची विविधता आहे. काजू उत्पादनासाठी गोवा प्रसिद्ध असून येथील शेती आणि जंगल परिसंस्था एकमेकांशी जोडलेली आहे. तसेच पश्चिम घाटातील घनदाट जंगलांमध्ये अनेक दुर्मीळ आणि स्थानिक प्रजातींचे अस्तित्व आढळते, ज्यामुळे या प्रदेशाचे पर्यावरणीय महत्त्व अधिक वाढते.

गोव्याची वन्यजीव संपत्तीदेखील उल्लेखनीय आहे. येथे बिबटे, सांबर, हरीण, रानडुक्कर, कोल्हे, भारतीय गवा, साळींदर यांसारखे प्राणी आढळतात. पक्ष्यांच्या बाबतीत गोवा अत्यंत समृद्ध आहे; फ्लेमिंगो, किंगफिशर, हॉर्नबिल, पांढरी घार यांसारखे अनेक आकर्षक पक्षी येथे दिसतात. गोव्यात सुमारे 500 पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. गोव्याचा राज्यपक्षी फ्लेम-थ्रोटीड बुलबुल (ऋश्रराश-ींहेीरींशव ईीश्रर्लीश्र) असून, त्यास स्थानिक कोंकणीत ‘कलगी’ असेही म्हटले जाते. गोवा हे सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणी (राहिळलळरपी) यांचेही घर आहे. येथे सापांच्या वीसपेक्षा अधिक प्रजाती आढळतात, ज्यामुळे या प्रदेशातील जैवविविधतेचे महत्त्व अधिकच वाढते. तसेच मोले राष्ट्रीय उद्यान आणि म्हादई, भगवान महावीर आणि खोतीगाव अभयारण्य यांसारख्या संरक्षित क्षेत्रांमुळे अनेक प्रजातींना सुरक्षित अधिवास मिळतो.
गोव्याची किनारपट्टी आणि सागरी परिसंस्थादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर खारफुटी, प्रवाळ (लेीरश्र ीशशषी) आणि मासेमारीसाठी उपयुक्त विविध सागरी जीव आढळतात. मासे, खेकडे, कोळंबी आणि इतर समुद्री जीव स्थानिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. मात्र, पर्यटन आणि शहरीकरणामुळे या सागरी परिसंस्थांवर ताण येत आहे, त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. गोव्यामध्ये नद्या आणि जलस्रोतांचे जाळेदेखील जैवविविधतेला चालना देते. मांडवी, झुआरी आणि इतर नद्या विविध जलचर जीवांना अधिवास देतात. या नद्यांच्या किनारी खारफुटीची जंगले विकसित झाली आहेत, जी किनारी भागांचे संरक्षण करण्यास मदत करतात आणि अनेक प्रजातींसाठी प्रजनन क्षेत्र म्हणून कार्य करतात.

गोव्यात विविध हवामान, पर्जन्यमान आणि मातीच्या प्रकारांमुळे अनेक प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. किनारपट्टी भागात भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते, कारण येथे पाणीपुरवठा मुबलक असतो. भात हे गोव्याचे मुख्य अन्नधान्य पीक आहे. काजू हे एक महत्त्वाचे नगदी पीक असून राज्याच्या अर्थव्यवस्थेत त्याचे मोठे योगदान आहे. तसेच नारळ, सुपारी, आंबा, फणस, केळी आणि पपई यांसारखी फळझाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. या फळझाडांमुळे गोव्याच्या शेतीला जैवविविधतेचा समृद्ध आधार मिळतो. येथे भाजीपाला शेतीदेखील केली जाते, जसे की मिरची, वांगी, दोडका, भेंडी आणि इतर स्थानिक भाज्या. काही भागांत मसाल्यांची शेतीही होते, ज्यामध्ये काळी मिरी, हळद आणि आले यांचा समावेश आहे. या विविध पिकांमुळे गोव्याची कृषिव्यवस्था बहुविध आणि संतुलित राहते. गोव्यात कृषी जैवविविधतेसोबतच पारंपरिक शेती पद्धतीदेखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यामध्ये कुळागर, खाजन आणि पुरण शेती या विशेष पद्धतींचा समावेश होतो, ज्या स्थानिक पर्यावरणाशी सुसंगत पद्धतीने विकसित झाल्या आहेत. पारंपरिक शेती पद्धती आणि स्थानिक बियाण्यांचा वापर यामुळे कृषी जैवविविधता टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे गोव्याची शेती ही पर्यावरणपूरक आणि जैवविविधतेने समृद्ध अशी मानली जाते.

अलीकडच्या काळात विविध मानवी आणि नैसर्गिक कारणांमुळे येथील जैवविविधता आणि अधिवास यांना गंभीर धोके निर्माण झाले आहेत. जलद शहरीकरण, पर्यटनाचा वाढता दबाव आणि औद्योगिकीकरण यामुळे नैसर्गिक परिसंस्थांवर मोठा परिणाम होत आहे. रस्ते, इमारती आणि खाणकामासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात आहेत. यामुळे वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत असून अनेक वन्यप्राणी अन्न, पाणी आणि सुरक्षित आश्रयाच्या शोधात आपले मूळ अधिवास सोडून मानवी वस्ती आणि कृषी क्षेत्रांकडे स्थलांतर करताना आढळतात. नद्या आणि जलस्रोतांचे प्रदूषण हे आणखी एक मोठे आव्हान आहे. औद्योगिक कचरा, सांडपाणी आणि रासायनिक पदार्थ नद्यांमध्ये मिसळल्यामुळे जलचर जीवांवर विपरीत परिणाम होत आहे. तापमानातील बदल, अनियमित पाऊस आणि समुद्र पातळी वाढ यामुळे परिसंस्थांचे संतुलन बिघडत आहे.
स्थानिक पातळीवरील कृतीद्वारे जागतिक परिणाम (ङेलरश्र रलींळेप षेी ॠश्रेलरश्र खारिलीं) ही संकल्पना आजच्या पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. जैवविविधतेचे संरक्षण हे केवळ जागतिक संस्थांचे काम नसून प्रत्येक गाव, शहर आणि व्यक्तीच्या सक्रिय सहभागावर अवलंबून आहे. याच पार्श्वभूमीवर जैवविविधता व्यवस्थापन समित्या आणि जनतेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. जंगलतोड थांबवणे, पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवणे, शेतजमिनी जपून ठेवणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. स्थानिक लोकांनी आपल्या परिसरातील जैवविविधतेची माहिती ‘बीएमसी’ला देणे आणि संवर्धन उपक्रमांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. शेती, पर्यटन आणि विकास प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. खारफुटी, नद्या, जंगले आणि किनारपट्टी यांचे संरक्षण केल्यास केवळ स्थानिक पर्यावरणच नव्हे तर जागतिक हवामान संतुलनालाही फायदा होतो. कारण स्थानिक परिसंस्थांचे संरक्षण हे जागतिक पर्यावरणावर थेट परिणाम करते.