Home बातम्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद

आत्महत्येप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद

0

मंगेशी येथील प्रकाश कामत यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी एकूण 4 जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह कुटुंबीयांना स्वीकारला. बुधवारी रात्री विहिरीत उडी घेऊन प्रकाश कामत यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी प्रकाश कामत यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत 4 जण सतावणूक करीत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. त्यामुळे त्या 4 जणांविरोधात गुन्हा नोंदवल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला होता. यानंतर पोलिसानी शुक्रवारी सकाळी चिठ्ठीत नावे नमूद केलेल्या चार जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारला.