आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते ठार

0
6

पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून हल्ल्यांचे सत्र सुरू आहे. विशेष करून चीनच्या भागीदारीमध्ये ज्या ठिकाणी प्रकल्प सुरू आहेत, त्याठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात येत आहेत. काल वायव्य पाकिस्तानमध्ये एका वाहनावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चीनमधील पाच अभियंते आणि पाकिस्तानी वाहनचालकाचा मृत्यू झाला. एकावाहनातून पाच चीनी अभियंत्यांना इस्लामाबाद ते खैबर पख्तुन्ख्वामधील दासू याठिकाणी आणले जात होते, त्यावेळी स्फोटकांनी युक्त अशा आत्मघाती व्यक्तीने पाकिस्तानी वाहनाला जाऊन धडक दिली, अशी माहिती या प्रांताचे पोलीस प्रमुख मोहम्मद अली गंदापूर यांनी दिली.