आता यलो फंगसचा धोका; उत्तर प्रदेशात पहिला रुग्ण

0
142

देशामध्ये एकीकडे ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच, काही दिवसांपूर्वी व्हाइट फंगस म्हणजेच पांढर्‍या बुरशीसंदर्भातही इशारा देण्यात आला होता. त्यातच आता उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये ‘यलो’ फंगसचाही पहिला रुग्ण आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यलो फंगसचा संसर्ग हा ब्लॅक फंगस आणि व्हाइट फंगसपेक्षा अधिक धोकादायक आहे.