आता अधिक काळजी घेण्याची गरज

0
130

>> पंतप्रधानांचे ‘मन की बात’मधून जनतेला आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी काल रविवारी ‘मन की बात’च्या १२ व्या भागातून संवाद साधताना आता लॉकडाउन शिथिल होत असून आता अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन केले. मन की बातमध्ये पंतप्रधांनी काल विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले.

कोरोनासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, देशाने कोरोनाविरोधात एकजुटीने लढा दिला आहे. त्यापासून बचावासाठी आपण सावधानता बाळगत आता देशांतर्गत विमान सेवा सुरू केली आहे. हळूहळू उद्योग व्यवसायही सुरू होतील. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आता सुरू होईल. मात्र त्यामुळेच आपल्याला आता अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आपली लोकसंख्या ही इतर देशांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. तरीही देशात इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा फैलाव कमी वेगाने होत आहे. तसेच मृत्युदरदेखील कमी आहे. मात्र आपल्या नुकसानामुळे सर्वांनाच दुःख होत आहे. परंतु जे आपण वाचवले आहे ते देशाच्या सामूहिक संघटनेचा भाग असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी नमुद केले.
स्थलांतरावर बोलताना पंतप्रधानांनी, या कोरोनाचा सर्वात मोठा फटका आपली गरीब जनता, कामगार, श्रमिक वर्गाला बसल्याचे सांगत त्यांची अडचण, त्यांचे दुःख, यातना या शब्दांत सांगतल्या जाऊ शकत नसल्याचे सांगितले.

भारतीयांच्या सेवा-शक्तीमुळे कोरोनाला रोखण्यात यश आले असून देशवासीयांची सेवाशक्ती ही आपली खरी ताकद असल्याचे या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.