आज पर्वरीत ‘सहकार भारती’चे अधिवेशन

0
276

गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमधून प्रतिनिधींची उपस्थिती
आज शनिवार दि. १ रोजी दुपारी ३.३० वा. विद्याप्रबोधिनी पर्वरी येथे होणार्‍या सहकार भारतीच्या अधिवेशनास गोवा, महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यातील प्रतिनिधींची नोंदणी झाल्याची माहिती प्रकाश वेळीप यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. दोन दिवसांच्या या अधिवेशनाचे उद्घाटन दुपारी होणार असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती असेल.गोव्यात १२२ अर्बन के्रडिट सोसायट्या तर २५५ वेतन सोसायट्या आहेत. सहकार चळवळ बळकट करणे हा या अधिवेशनाचा हेतू आहे. महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक राज्यात सहकार चळवळीचा चांगला विस्तार झाला आहे. संपूर्ण देशात ही चळवळ बळकट करण्याचा सहकार भारतीचा हेतू असल्याचे वेळीप यांनी सांगितले.
सहकार क्षेत्रातील सोसायट्या, बँकांचा व्यवहार विश्‍वासावर चालतो. जनतेच्या मनातील विश्‍वास वाढावा यासाठी ग्राहकांना हमी देणारी यंत्रणा असावी, यासाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचे वेळीप यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस सहकार भारतीचे राष्ट्रीय सरचिटणीस विजय देवंगर, प्रा. सुभाष वेलिंगकर, सुभाष हळर्णकर व सुर्या गावडे उपस्थित होते.