हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी
येथील हवामान विभागाने राज्यात 12 जून 2025 रोजी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली असून रेड अलर्ट जारी केला आहे. आंध्रप्रदेश किनाऱ्याजवळ पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरातील वादळी परिस्थितीमुळे जोरदार पावसाची शक्यता आहे.
राज्यात गेले काही दिवस मंदावलेला मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जोरदार पावसाबरोबर ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 50 किलो मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 13 जूनसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, 14 ते 17 जूनसाठी एलो अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाने जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर 101 हॉटलाईनसह 7391047123 आणि 7391047172 हे अतिरिक्त हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. काही तांत्रिक कारणास्तव अग्निशामक दलाचे बीएसएनएल क्रमांक बंद आहेत, असे कळविण्यात आले आहे.