आजपासून सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती

0
76

आज गुरुवार दि. २ पासून राज्याच्या सर्व महामार्गावरून वाहतूक करणार्‍या दुचाकी स्वारांना व सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती निर्णयाची अमलबजावणी होणार असून शहरी भागात हेल्मेटची सक्ती नसेल.
यापूर्वी शहरी भागातही हेल्मेट सक्ती करण्याचे ठरले होते. शहरी भागात हेल्मेट सक्ती न केल्याने जनतेला बर्‍याच प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महामार्गावरून प्रवास करणार्‍या दुचाकीस्वाराला आता कुणालाही वाटेत लिप्ट देणे शक्य होणार नाही. मोटरसायकल पायलटांचा प्रश्‍न कसा सोडविणार या बाबतीत सध्या तरी काहीही स्पष्ट नाही.