आजपासून भाजप करणार २४ मतदारसंघांचा दौरा

0
50

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने दि. १० ते दि. १५ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील २४ मतदारसंघांचा दौरा करण्याचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे या दौर्‍याचे नेतृत्व करणार आहेत. उर्वरित १६ मतदारसंघांचा दौरा गणेशचतुर्थीपूर्वी केला जाणार आहे.

काल पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झालेल्या मतदारसंघ प्रभारी, मंडळ अध्यक्ष व मंडळ सचिवांच्या बैठकीत या दौर्‍याची निश्‍चिती करण्यात आली. दि. १० रोजीपासून या दौर्‍याला सुरुवात होणार आहे.

प्रदेशाध्यक्षांचा दौरा हा संघटनात्मक पातळीवरील संवादासाठी, तर मुख्यमंत्र्यांचा दौरा हा कार्यकर्ते व जनतेसोबतच्या संवादासाठी आहे, असे सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व मतदारसंघांतील विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले आहे, असेही त्यांनी सांगितले.