आग्वाद किल्ल्यावरील वस्तुसंग्रहालय १ सप्टेंबरपासून खुले

0
20

>> मुख्यमंत्री; विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत पाहता येणार; पर्यटकांना शुल्क आकारणार

आग्वाद किल्ल्यावरील वस्तुसंग्रहालय येत्या १ सप्टेंबरपासून जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना आग्वाद किल्ल्यातील वस्तुसंग्रहालय वर्षभर मोफत पाहता येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आग्वाद किल्ल्यावरील वस्तुसंग्रहालयात ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. गोव्यावर पोर्तुगीजांनी चारशे वर्ष राज्य केले. गोवा हे गरीब राज्य नव्हते, तर पोर्तुगीजांनी येथील धनदौलत लुटून नेली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आग्वाद किल्ल्यातील वस्तुसंग्रहाल विद्यार्थ्यांना एक वर्षभर मोफत पाहता येणार आहे. पर्यटकांकडून शुल्क आकारले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, विरोधी पक्षनेते मायकल लोबो, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, पोलीस महासंचालक जसपाल सिंग व इतरांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते पाच स्वातंत्र्य सैनिकांचा श्रीफळ, शाल देऊन सन्मान करण्यात आला. आग्वाद किल्ल्याचे अंदाजे २८ कोटी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात आले आहे.