आखाडा परिषदेच्या नरेंद्र गिरी यांचा मृत्यू

0
34

आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह प्रयागराज येथील गेस्ट हाउसमध्ये काल आढळला. मृतदेहाजवळ पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठीही आढळली आहे, त्यात एका शिष्यामुळे दुःखी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या चिठ्ठीत त्यांनी शिष्य आनंद गिरी यांच्या नावाचा उल्लेख केल्याने आनंद गिरी यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे; मात्र पोलिसांनी या प्रकरणी कुठलीही माहिती देण्यास नकार दिला आहे. ही आत्महत्या असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.