रशियात अंदाधुंद गोळीबार; आठ ठार, सहाजण जखमी

0
34

रशियातील एका विद्यापीठात एका अज्ञाताने अंदाधुंद गोळीबार केला. त्यात आठ जण ठार, तर सहाजण जखमी झाले आहेत. पर्म स्टेट विद्यापीठात झालेल्या या गोळीबारातून वाचण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या मारल्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणातील हल्लेखोराची ओळख पटली असून, त्याचे नाव टिमूर बेकमॅन्सुरोव असे आहे. घटनास्थळी झालेल्या कारवाईत तो ठार झाला आहे.