तेजपालविरुद्धच्या बलात्कार प्रकरणाची सुनावणी तहकूब

0
31

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल तरुण तेजपालविरुद्धच्या बलात्कार प्रकरणाची सुनावणी तहकूब केली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या दि. २७ ऑक्टोबर रोजी व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे. ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम आणि तेजपाल याच्या वकिलांनी ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केल्यानंतर एम. एस. सोनक व एम. एस. जवळकर यांनी यासंबंधीची सुनावणी पुढे ढकलली.

या खटल्याची व्हर्च्युअल पद्धतीने सुनावणी घेता यावी यासाठी आवश्यक ती सुविधा पुढील तारखेपर्यंत उभारण्यात येईल, असे न्यायमूर्ती सोनक यांनी यावेळी स्पष्ट केले. भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्याच्यावतीने बाजू लढवली असून, ते नवी दिल्ली येथून व्हर्च्युअलपणे सुनावणीत भाग घेणार आहेत. तरुण तेजपाल याच्यावर आपल्या सहकारी पत्रकार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. म्हापसा येथील विशेष न्यायालयाने त्याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केल्यानंतर गोवा सरकारने या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर आव्हान दिले आहे.