‘आकाश प्राईम’ची यशस्वी चाचणी

0
46

डीआरडीओने जमिनीवरुन हवेत मारा करत लक्ष्यभेद करणार्‍या आकाश क्षेपणास्त्राच्या सुधारित आवृत्ती असलेल्या ‘आकाश प्राईम’ची यशस्वी चाचणी काल घेतली. ओडिशातील चांदीपूर येथील तळावरुन ही चाचणी घेण्यात आली. सुरुवातीला विकसित करण्यात आलेल्या आकाश क्षेपणास्त्राच्या तुलनेत नव्या दमाच्या आकाश प्राईममध्ये स्वदेशी उपकरणांचा जास्त वापर करण्यात आला आहे. आकाश प्राईममध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आणखी अचूकतेने ग्रहण करणारी स्वदेशी बनावटीची यंत्रणा बसवण्यात आली आहे. ३० किलोमीटरच्या परिघातील जमिनीपासून २० किलोमीटर उंचीपर्यंतचे लक्ष्य अचूक भेदण्याची आकाश क्षेपणास्त्राची मूळ क्षमता आहे. ध्वनीपेक्षा ३ पट वेगाने आकाश क्षेपणास्त्र लक्ष्यभेद करु शकते. आता आकाश प्राईमच्या रुपात या क्षेपणास्त्रात आणखी अचूकता आली आहे.