आंध्र प्रदेशचे मंत्रिमंडळ बरखास्त

0
29

>> सर्व मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी काल अख्खे मंत्रिमंडळच बरखास्त केले. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व २४ मंत्र्यांनी आपले राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे सादर केले. येत्या ११ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित असून त्यात बहुतेक नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर कॉंग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. २०२४ मध्ये होणआर्‍या निवडणुकीतही असाच विजय मिळवण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळात घाऊक ङ्गेरबदल करत नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला असावा असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या मध्यावर टीम बदलली जाईल, असे ते म्हणाले होते. त्यानुसार हे बदल करण्यात येणार असल्याचा अंदाज आहे.